दरवर्षी प्रमाणे श्रीसमर्थ सेवा मंडळ तर्फे समर्थ सदन,सातारा येथे दासनवमी उत्सव पार पडला. रोज सकाळी दासबोध पारायण समर्थभक्त बाळूबुवा रामदासी यांच्या आधिपत्याखाली पार पडले. या उत्सवात पहिल्या दिवशी सायंकाळी समर्थभक्त विजय लाड यांचे समर्थउद्बोधन झाले. २ऱ्या आणि ३ऱ्या दिवशीच्या संध्याकाळी समर्थभक्त संजय कोटणीस यांच्या व्याख्यानाने सारे श्रोते रंगून गेले. ४था आणि ५वा दिवस होता सौ.विद्यागौरी ठुसे यांच्या किर्तनसेवेचा. ही सेवा ही अतिशय सुंदर झाली. ६वा दिवस सौ.रमा कुलकर्णी यांच्या सुश्राव्य गायनाने अविस्मरणीय झाला. ७वा आणि ८वा दिवस समर्थभक्त नंदकुमार देशपांडे यांच्या अतिशय अभ्यासपूर्ण व्याख्यानाने पुनित झाला. तर ९व्या दिवशी समर्थभक्त कुमारी दिपाताई भंडारे यांच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता करणारा असा अतिशय देखणा असा झाला. द्वितीया,षष्ठी आणि अष्टमीची ची दुपार ही भजनसेवा आणि स्तोत्र पठणाने अधिकच भक्तिपूर्णता देऊन गेली.